!!चॅलेंज अकॅडमी कोरेगाव भेट !!
आज कोरेगाव येथील चॅलेंज अकॅडमीला भेट देण्याचा योग आला. माझेसमवेत आमच्या गावचे भूमिपुत्र चित्रपट निर्माते मा.मानसिंग पवार,अभियंता राजकुमार काळंगे, प्राथमिक शिक्षकसंघाचे नेते पांडुरंग पवार (गुरुजी)आदि होते.आम्ही सर्वजणच वर्णे येथील माध्यमिक शाळा संचलनाशी संबंधित आहोत.
चॅलेंज अकॅडमी ही संस्था मा.श्री.दिलीप वलियाविट्टील यांनी साकारलेली संस्था आहे. ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.मराठी तर आपली माय आहेच परंतु जागतिक स्तराचा विचार केला तर इंग्रजी ही तितकीच महत्वाची आहे. समाजाची ही गरज ओळखूनच ही शाळा सुरु करण्यात आली.याठिकाणी प्लेग्रुपपासून दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. येथील अभ्यासक्रम स्टेट बोर्ड तसेच सी.बी.एस.ई. बोर्डाचा आहे.
शाळेच्या वैशिष्टयाबद्दल सांगावयाचे झाले तर येथे दैनंदिन अभासक्रमाबरोबर अभ्यासेतर उपक्रमावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून आले. विशेषतः क्रीडा क्षेत्रात शाळेने चांगले नाव कमावले आहे. येथील विध्यार्थी विविध खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत. या शाळेमुळे सातारा जिल्ह्याची मान राज्य तसेच देशात उंचावली आहे.शाळेची इमारत प्रशस्त आहे, क्रीडांगण मोठे आहे. शाळेला केंद्र सरकारची अटल टिकंरिंग लॅब मंजुर झालेली आहे. ही लॅब उभी करण्यासाठी केंद्र सरकारचे वीस लाखापर्यंतचे अनुदान उपलब्ध होते.
प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने एखादा गुण दिलेला असतो तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्याचाच विकास करता आला पाहिजे.तसेच शाळेचेदेखील आहे. या शाळेत क्रीडा क्षेत्राचा गुण अधिक विकसित झाल्याचे दिसून आले.
आपल्या जीवनाच्या बाबतीत देखील तसेच आहे.ज्या क्षेत्रात आपल्याला अधिक रस आहे ते काम प्रामाणिकपणे करावे.मला याठिकाणी सचिन तेंडुलकर याचे उदाहरण द्यावेसे वाटते.त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता पण खेळाची प्रचंड आवड होती त्यात त्यांनी जगभरात नाव कमावले. भारतरत्नसारख्या सर्वोच्च सन्मानाचे मानकरी ते ठरल्याचा आम्हास अभिमान वाटतो. चला तर आपणही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करुया, आपले स्वतःचे गावाचे,जिल्ह्याचे,राज्याचे नाव देशात उंचावण्यासाठी प्रयत्न करुया असेच म्हणावेसे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा