गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

!! शेतीविषयक कार्यशाळा - वर्णे !!

!!  शेतीविषयक कार्यशाळा   !!
      बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मा.मानसिंग पवार यांचे घरी शेतीविषयक कार्यशाळा संपन्न झाली.
    कार्यशाळेत चर्चिलेले विषय:-
१)मल्टीलेअर फार्मिंग -कमी कालावधीत तयार होणारी कोणतीही पिके साखळीपध्दतीने लावणे.उदा.आल्यात तोंडली,कोथिंबीर, किंवा अन्य भाज्या. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात अशा शेतीचा प्रारंभ झाला.
२)मसाला पिकांची शेती - मोहरी, जवस  किंवा सावलीत वाढणारी अन्य पिके. अशा प्रकारची शेती कोकणात केली जाते.
३)औषधी व सुगंधी वनस्पतीची शेती-सध्या गावात शतावरी,जिरेनियंमची शेती केली जाते. या शेतीमध्ये देखील वाढ होण्यास भरपूर वाव आहे.
          यावेळी मानसिंग पवार यांना आर.सी.एफ कडून प्रजासत्ताकदिनी " जीवन गौरव" पुरस्कार    मिळालयाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


     शब्दांकन -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...