गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (६)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (६)
        आजचे कीर्तन ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांचे झाले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी माणकोजी बोधले यांचा अभंग घेतला होता.तो खालीलप्रमाणे--
 संता वाचुनिया सुख कोठे नाही।अमृत ज्यांचे पायी नित्य वसे ।१।
संतांचे संगे होय मोक्ष गती।नको बा संगती दुर्जनांची ।धृ।
दुर्जनांचे संगे दुःख प्राप्त होय।तेथे कैची सोय तारावया।३।
बोधा म्हणे माझे सत्य हे  त्रिवाचा। नको अभक्तांचा संग देवा।४।
           हा चार चरणांचा अभंग आहे. यामध्ये संतांचे चरित्र मांडले आहे.दुःखामुळे सुखाला किंमत असते. सुख दुःख ही सापेक्ष कल्पना आहे. एखादी गोष्ट अनुकूल असेल तर सुख,प्रतिकूल असेल तर दुःख. नदीला पाणी असणे सुख तर पुराचे पाणी घरात घुसले तर दुःख.



           यावेळी  जयवंत महाराजांनी माणकोजी महाराज बोधले यांचे चरित्र सविस्तर सांगितले.महिपती महाराज यांनी बोधले महाराज यांचे मुळ चरित्र लिहिले आहे.बोधले महाराजांचे मुळगाव सासवड आहे. त्यांचे वडील भालजी जगताप धामणगाव येथे स्थायिक झाले. पांडुरंगाच्या बोधामुळे बोधले हे नाव पडले.मानकोजींचा आध्यात्माकडे मूळचा ओढा नव्हता. बंधूंच्यामुळे पंढरपूरला गेले. हट्टी स्वभावामुळे देवाचे दर्शन झाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे  मानकोजींनी  बंधू शिवाजीला सांगितले. प्रत्यक्ष देवांनी  तिसऱ्या दिवशी दर्शन दिले आणि मानकोजींचे जीवन बदलून गेले.
             मानकोजींनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर धामणगाव येथे  बांधले. मूर्ती प्रतिष्ठापणासाठी संत तुकाराम महाराज आले होते. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पुजा हयातभर केली.प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा याची शिकवण माणकोजी महाराज यांनी दिली.
          माणकोजी महाराजांचा जन्म १६०४ ला झाला होता.तर १६९४ ला त्यांनी समाधी घेतली. नंतर त्यांच्या पाच शिष्यानीदेखील समाधी घेतल्याचे सांगण्यात आले.
              आपण कर्माचा कंटाळा करु नये. आपली सेवा निरपेक्ष असेल तर आपणास कोणत्याही मार्गाने परमेश्वर साह्य करतो.  आपण नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावे. आपल्या वाट्याला आलेले काम निरपेक्ष भावनेने करावे. कामाचा कधीच आळस करु नये हाच संदेश आज मिळाला असे वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...