!! शिवार साहित्य संमेलन !!
शेतीमधील स्त्रियांचे योगदान मोलाचे -- सचिन प्रभुणे
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने अतीत जि. सातारा येथे
बाळासाहेब लोहार यांचे शेतावर "शिवार साहित्य संमेलन" आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुणे म्हणाले की, ज्या कुटुंबातील स्त्रिया शेतीत अधिक कष्ट करतात त्या कुटुंबाची अधिक प्रगती होते हे वास्तव आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून आपणास येणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा स्त्रियांना द्यायला हवा. मिळालेल्या वाट्याचाही योग्य विनियोग त्यांच्याकडून होईल व कुटूंबाची आर्थिक वृध्दी होईल. सचिन प्रभुणे पुढे म्हणाले की,शेती आणि शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहेत. शेती आणि साहित्य दोघेही निर्माते आहेत. साहित्य संमेलनात शेतीवर परिसंवाद व्हायला हवेत. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे शिक्षणात तर क्रांती झालीच त्यामुळे आपोआपच सामाजिक बदल घडून आले. महाराष्ट्र तसेच देशाच्या प्रगतीमध्ये या समाजसुधारकांचा वाटा मोठा आहे.
संमेलनाचे उदघाटन नागठाणे येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मनोहर साळुंखे यांचे हस्ते झाले. उदघाटनपर भाषणात ते म्हणाले की, शेती हा व्यवसाय अतिशय उत्तम आहे बऱ्याचवेळा आपणच आपल्या व्यवसायाला कमी लेखतो. शेतीकडे व्यवसाय म्हणून पहात नाही. दिवसातील ठराविक वेळ शेतात काम केले पाहिजे. नुसतेच ऊस शेतीच्या मागे न लागता कमी कालावधीची भाजीपाला, फळे यासारखी नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत जेणेकरुन दररोज पैसे मिळतील.
यावेळी डॉ. सुधाकर बेंद्रे यांनी फास (आता कसले डोळे पुसता, शोक करायचे नाटक करता, असेच दिसलं माळावर एक रोपटं ), सुहास चव्हाण यांनी ( दिल्लीत उठलेल वादळ, गल्लीपर्यंत पोहोचवायच, कर्जाच घुंगरू बनुन आमच्या काळजावरती नाचायच, काळ्या आईची आम्ही लेकरं ), प्रमोद मोहिते यांनी ( चिऊ मरुनिया गेली, पाणी शोधत तळ्यात ), डॉ. उमेश करंबेळकर यांनी (आताशा मी माणसापेक्षा झाडातच जास्त रमतो ). शाहीर लोखंडे यांनी ( येऊन बघ एक दिवस माळात माझ्या, अग चल ग चिऊताई एक कविता करु. अवकाळी पाऊस लेका खुळा म्हणून पडत नाही. खरा महाराष्ट्र बोलतोय शेती संपावर गेली तर) , अजित जाधव यांनी( लेक परक्याची कमाई), या कविता सादर केल्या. तर गणेश उतेकर यांनी बाप या विषयावर कथा सांगितली. अजित साळुंखे यांनी मनोहर साळुंखे यांच्यावर डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी तयार केलेली कविता वाचून दाखवली.
यावेळी पोपटराव पवार , राहीबाई पोपेरे या पदमश्री पुरस्कार प्राप्त राज्यातील शेतकऱ्यांबरोबर सातारा जिल्ह्यातील अशोक इंगवले (बिदाल), संजीवन फाळके (सातारा रोड), कुसूमताई कर्पे (कर्पेवाडी), या शेतकऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी , सूत्रसंचालन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे यांनी तर आभार कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी मानले.
कार्यक्रमास चंद्रशेखर बेबले,संजय नलवडे यांचेसह परिसरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. आपण शेती तसेच शिक्षण याबाबीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे यामुळेच आपली प्रगती होणार आहे असे मला वाटते .
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

छानच
उत्तर द्याहटवा