रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

!! सातारा हिल हाफ मॅरेथॉन !! 2022

 !! सातारा हिल हाफ मॅरेथॉन !!

           आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये मी भाग घेतला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मला ०२:०१:१६ दोन तास एक मिनिट १६ सेकंद  एवढा वेळ लागला. माझे यापूर्वीचे रेकार्ड मोडल्याचा विशेष आनंद झाला. पूर्वीपेक्षा मला ११ मिनिटे कमी वेळ लागला. आज माझ्याबरोबर आमचे डॉ. श्रीधर यांनीही भाग घेतला होता.

          








         ही स्पर्धा सातारा हिल रनर्स फौंडेशननी आयोजित केली होती. मॅरेथॉनची सुरुवात साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. 

            या स्पर्धेसाठी रुट सपोर्ट छानच होता. ठीकठिकाणी वाद्यवृंद होते.मार्गावर बऱ्याच ठिकाणी पाणी, लेमन ज्युस, चिक्कीची व्यवस्था होती. रनर्सना त्रास झाला तर अंबुलन्सची व्यवस्था होती. एकंदरीत आजची स्पर्धा खूपच छान झाली. आपलं आरोग्य चांगले राहावे यासाठी चालणे, धावणेचा व्यायाम करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...